कोल्हापूर /प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठानजिक ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाली तर त्यांची 4 वर्षाची चिमुरडी व अन्य एक वृद्ध महिला किरकोळ जखमी झाल्या. रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शितल सचीन कवडे (वय 30 रा. पद्माराजे हौसिंग सोसायटी उजळाईवाडी ता. करवीर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर ईशिता कवडे, वैजयंती अशोक पाटील अशी जखमींची नावे आहेत. ट्रकच्या धडकेत दुचाकी सुमारे 20 ते 25 फुट ओढत नेली.
याबाबतची माहिती अशी, रविवारी सकाळी शितल कवडे त्यांची मुलगी ईशितासह वैजयंती पाटील यांच्या नातेवाईकांकडे टेंबे रोडवर आल्या होत्या. नातेवाईकांची भेट घेवून ओढय़ावरील गणपतीचे दर्शन घेवून त्या मोपेडवरुन तिघी घरी जात होत्या. शिवाजी विद्यापीठ पोस्ट ऑफीस चौकानजीक कागलकडे निघालेल्या एका ट्रकची त्यांना जोरदार धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील वैजयंता आणि ईशिता या खाली पडल्या. तर शीतल ट्रकच्या चाकाखाली सापडल्या. ट्रकचे मागील चाक शितल यांच्या पायावरुन गेल्यामुळे त्यांच्या कंबरेखालील भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना 108 रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले, तर वैजयंता पाटील आणि ईशिता यांना जीतेंद्र शिंदे यांनी त्यांच्या रिक्षातून सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान शीतल कवडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली. पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले. अपघाताची माहिती मिळताच कवडे आणि पाटील कटुंबीयांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. नातेवाईकांनी केलेला आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता.
घटनास्थळी रक्ताचे थारोळे
अपघातानंतर शीतल कवडे ट्रकखालीच विव्हळत पडल्या होत्या, तर ईशिता आणि पाटील मदतीसाठी आरडा ओरडा करीत होत्या. दुचाकीच्या डिकीतील खिचडी रस्त्यावर विखुरली होती. रिक्षाचालक जीतेंद्र शिंदे यांनी तातडीने sरुग्णवाहिका बोलवून घेतली. अपघातानंतर छोटी ईशिता भेदरलेल्या अवस्थेत होती. तीला याबद्दल पुसटशीही कल्पना नव्हती केवळ अपघात झाला एवढेच तिला कळत होते. आई जखमी असून तीला दुखापत झाली असल्याचेच तिला वाटत हेते. दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत ईशिता खिन्न नजरेने नातेवाईकांच्या कुशित बसून होती.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









