संशयित आरोपी पतीसह तिघे उमदी पोलिसांच्या ताब्यात
जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील कुणीकोणुर येथे आई प्रियंका बिराप्पा बेंळुखी (वय-३२) व मुलगी मोहीणी बिराप्पा बेंळुखी (वय-१४) या मायलेकीचा रात्री १० च्या सुमारास गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली. या दुहेरी हत्येमुळे तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. गेल्या महिन्यात कोसारी येथे दुहेरी हत्याकांड झाले होते, त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.
अधिक माहिती अशी, कुणीकोणूर ते सनमडी रोडवर असलेल्या बेळंखी वस्ती येथील बिराप्पा बेळंखी यांच्या घराजवळील झोपडीत हे दुहेरी हत्या घडली आहे. या घटनेची फिर्याद पोलिस पाटील तानाजी कृष्णदेव पाटील यांनी उमदी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून पती बिरप्पा याच्यासह अन्य तिघांना ताब्यात घेतले आहे. या मयलेकिंची हत्या कोणत्या कारणातून झाली याचा तपास उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करीत आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची चर्चा सुरू आहे.








