हैदराबाद :
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये साईलक्ष्मी नावाच्या एका महिलेने स्वत:च्या दोन वर्षीय जुळ्या मुलांची हत्या केल्यावर आत्महत्या केली आहे. मुलाच्या आजारपणावरून पतीसोबत झालेल्या भांडणानंतर महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत तपास सुरू केला आहे. संबंधित महिला 27 वर्षांची होती असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.









