Panhala News Marathi : तुटलेल्या विजेच्या तारेच्या धक्क्याने मायलेकराचा जागीच मृत्यू झाला. पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथे ही दुर्दैवी घटना घडली. नंदा मुगदुम व अजिंक्य मुगदुम अशी दुर्दैवी मृत मायलेकररांची नांवे आहेत. या घटनेची माहिती गावकऱ्यांना समजताच त्यांनी पोलीसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे. मायलेकरांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आज सकाळपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसाळ्यात विजेच्या तारा तुटने , विज पडल्याने याआधी अनेकांना आपला जी गमवावा लागला आहे. दरम्यान, आज सकाळी पन्हाळा तालुक्यातील नेबापूरातील घटलेल्या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.