उचगाव/वार्ताहर
Kolhapur Accident News : कार्तिकी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांवर सांगोला येथे भरधाव मोटारीने चिरडलेल्या भाविकांमध्ये वळिवडे (ता. करवीर) येथील सुनिता उत्तम पोवार (वय ४५ वर्षे) आणि गौरव उत्तम पोवार (वय १२ वर्षे) या दुर्दैवी मायलेकांचा मृत्यू झाला.जठारवाडी येथील बहिणीकडे जाऊन तेथून पंढरपूरसाठी सुनिता या गेल्या होत्या.तेरा वर्षांपूर्वी सुनिता यांचे पती उत्तम यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर काबाडकष्टाने त्या संसाराचा गाडा ओढत असताना झालेल्या या दुर्दैवी घटनेने परिवारच उध्वस्त झाला.
याबाबतची माहिती अशी की,सुनिता पोवार या गांधीनगर येथील हेमू कलानी प्रायमरी स्कूलमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. तर त्यांचा मुलगा गौरव हा याच संस्थेच्या गांधीनगर हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होता.दोघांनाही दिवाळीची सुट्टी असल्यामुळे सुनिता या जठारवाडी येथील बहिणीकडे गेल्या होत्या.तेथून त्या पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी मुलाला घेऊन गेल्या होत्या.आज सायंकाळी भरधाव मोटारीने चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी गावात येऊन धडकली आणि गावावर शोककळा पसरली.तेरा वर्षांपूर्वी सुनिता यांचे पती उत्तम यांचा अपघाती मृत्यू झाला होता.त्यानंतर त्यांनी कष्टाने संसार करत दोन मुलींना शिकविले.दोन्ही मुलींचे लग्न केले.तर मुलाचे शिक्षण त्या करत होत्या.पोवार कुटुंबियांवर कोसळलेल्या या आघाताने गावावर तसेच वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली.रात्री उशिरा त्यांचे मृतदेह आणण्यासाठी गावातील तरुण सांगोल्याकडे निघाले.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला गावचे सरपंच अनिल पंढरे यांची पुतणी ऋतुजा रविंद्र पंढरे हिचा पुणे बंगळूर महामार्गावर अपघाती मृत्यू झाला होता.या घटनेस आठ दिवस होत नाहीत तोपर्यंत पोवार कुटुंबियांवर हा आघात झाल्याने गावकरी सुन्न झाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









