कोल्हापूर :
नवजात बाळापाठोपाठ आईचाही ऑपरेशन दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सिपीआर रुग्णालयात घडली. रेखा सुनील पवार (वय 20 रा. एwरोली, नवी मुंबई) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद सिपीआर रुग्णालयात झाली. बाळाचा मृत्यू पोटातच झाला, तर ऑपरेशन करत असताना रेखा पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांचाही मृत्यू झ्ा़ाल्याने पवार कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला.
याबाबत माहिती अशी, पुलाची शिरोली येथील रेखा यांचे एक वर्षापूर्वी मुंबई येथील सुनील पवार यांच्यासोबत विवाह झाला. लग्नानंतर ती पतीसोबत मुंबईत राहत होती. तिच्या माहेरच्यांनी बाळंतपणासाठी दोन महिन्यापुर्वी शिरोलीमध्ये आणले होते. रेखा यांना नुकतेच नऊ महिने पूर्ण झाले होते. सोमवारी रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. नातेवाईकांनी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मंगळवारी सकाळी प्रसुतीवेळी बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे सिझेरीयनद्वारे प्रसुती केली. दरम्यान, उपचार सुरू असताना रेखाची प्रकृती अधिकच खालावली. यातच दुपारी एकच्या सुमारास तिचाही मृत्यू झाला. सायंकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याची नोंद शिरोली एमआयडीसी ठाण्यात झाली.








