गोवा आंतरराष्ट्रिय फिल्म फेस्टिव्हलमध्ये इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी वादग्रस्त चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर “अभद्र आणि अपप्रचारी” अशा केलेल्या टिप्पणीमुळे राजकीय वादळ उठले आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी ‘ईप्फी’चे ज्युरी लॅपिडवर जोरदार टीका केली, तर शिवसेनासह अऩेक विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्य बोलण्याचे धाडस केल्याबद्दल लॅपिड यांच्याशी सहमती दर्शवली आहे.
लॅपिडच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, “काश्मीर फाइल्सबाबत हे तंतोतंत खरे आहे. हा एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाविरुद्ध केला गेलेला अपप्रचार होता. एक पक्ष आणि त्याचे सरकार प्रचारात व्यस्त होते. पण काश्मीरमध्ये सर्वाधिक हत्या या चित्रपटानंतर झाल्या. काश्मीर पंडित, सुरक्षा कर्मचारी मारले गेले.” अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









