मुंबई :
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (एलआरएस) द्वारे भारताचे रेमिटन्स एप्रिलमधील 2.33 अब्ज डॉलरवरून मे 2023 मध्ये 2.88 अब्ज डॉलर झाले आहेत. सदरची कामगिरी होण्यामागे प्रामुख्याने विदेश प्रवासावरील खर्च वाढल्याचा परिणाम राहिला असल्याची माहिती आहे.
भारतीयांनी मे 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासावर 1.5 अब्ज डॉलर खर्च केले, जे एप्रिल 2023 मध्ये 1.10 अब्ज डॉलर होते. रिझर्व्ह बँकेने जारी केलेले जुलै मासिक बुलेटिनमध्ये मे 2022 मध्ये खर्च केलेल्या जवळपास 1 अब्जच्या तुलनेतही वेगाने वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मे 2023 मध्ये विदेशी रेमिटन्स 41.58 टक्क्यांनी वाढले आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रवासानंतर, भारतीयांनी सर्वात जास्त पैसे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना पाठवले (49 दशलक्ष), त्यानंतर 39 दशलक्ष भेटवस्तू आणि 24.7 दशलक्ष परदेशात शिक्षणासाठी खर्च करण्यासाठी पाठविण्यात आले असल्याची महिती आहे.









