मोजता-मोजता थकून जाल
सर्वसाधारणपणे शहरांमध्ये रस्त्यांनी लोक अधिक प्रवास करत असतात. परंतु जगातील अनेक शहरांमध्ये भूमीपेक्षा अधिक नद्या-कालव्यांचे क्षेत्र आहे. तेथे रस्त्यांपेक्षा अधिक पूल आहेत. सर्वसाधारणपणे कुठल्याही शहरात 7-8 पूल असतात. परंतु एक असे शहर आहे, जेथील पुलांची संख्या हजारोंमध्ये आहे.
हॅम्बर्ग हे उत्तर जर्मनीतील अत्यंत प्रमुख असून अत्यंत मोठे बंदर आहे. हॅम्बर्ग स्वत:च्या कला संग्रहालयाच्या वास्तुकलेसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. याचबरोबर हॅम्बर्ग आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. हॅम्बर्ग शहरातील बहुतांश हिस्स्यात नद्या आणि कालवे आहेत. ते ओलांडण्यासाठी मोठ्या संख्येत पूल उभारण्यात आले आहेत.
हॅम्बर्ग शहरात जगात सर्वाधिक पूल आहेत. या शहरात पुलाची संख्या हजारोंमध्ये आहे. हॅम्बर्गमध्ये पूलांची एकूण संख्या 2500 पेक्षाही अधिक आहे. पूलांची ही संख्या वेनिस, अॅमस्टरडॅम आणि लंडनपेक्षाही अधिक आहे. हॅम्बर्गमध्ये कोहलब्रांडब्रुक, उबरसीब्रुक, ब्रूक्सब्रुक, पोग्गेनमुहलेनब्रुक आणि फीनटेइचब्रुक पाहण्याजोगे आहे.
उत्तरेतील वेनिस
हॅम्बर्ग शहराला उत्तरेतील वेनिस असेही संबोधिले जाते. डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगेन 88 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेले आहे. तर हॅम्बर्ग शहराचे बंदरच 74 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेले आहे. हॅम्बर्गमधून नदीखालून ‘विलकोम-होफ्ट’ असून ते हॅम्बर्ग शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक शहराचे स्वागत करते. हॅम्बर्ग बंदराला जर्मनीचे ‘जगाचे प्रवेशद्वार’ असेही म्हटले जाते. हे जर्मनीतील सर्वात मोठे बंदर असून जगातील सर्वात व्यग्र बंदरांपैकी एक आहे. 74 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेल्या या बंदरामधूनच युरोप आणि उर्वरित जगादरम्यान व्यापार सहजपणे होऊ शकतो.









