बांधकाम खात्याचे दुर्लक्ष : पोलिसांनी घेतला धसका
फोंडा : फोंडा पोलीस स्थानकाच्या आवारात स्वच्छतागृहाच्या टाकीचे पाणी उघड्यावऊन वाहत असून या गलिच्छ वातावरणात काम करण्याची बिकट स्थिती येथील पोलीस कर्मचाऱ्यांवर ओढवली आहे. पोलीस स्थानक इमारतीच्या पाठिमागे असलेल्या या टाकीचे दुषित पाणी गेले वर्षभर उघड्यावऊन वाहत आहे. सध्या फोंडा शहरात डेंग्यूची साथ असून हे वातावरण रोग फैलावासाठी पोषक बनले आहे. पाण्याचे डबके ज्या ठिकाणी तयार झाले आहे, तेथे समोरच सीआयडी पोलीस विभागाचे कार्यालय आहे. बाजूला कॅन्टिन तर त्याच्या वरच्या मजल्यावर उपअधीक्षक कार्यालय, उपनिरीक्षकांचे कक्ष व दुसऱ्या मजल्यावर ड्युटीवर असणारे उपनिरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांसाठी निवासी खोल्या आहेत. स्वच्छता गृहाच्या टाकीतून उघड्यावर वाहणारे पाण्याचे डबके डास पैदासीचे केंद्र बनल्याने या सर्वांनाच ते त्रासदायक ठरले आहे. गेल्या वर्षी पोलीस स्थानकात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण झाली होती. या प्रकरानंतरही त्याकडे कुणीच फारसे गांभीर्याने लक्ष घातलेले नाही. पोलीस स्थानकाच्या इमारतीची देखरेख सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागाकडून पाहिली जाते. या समस्येबाबत त्यांना लेखी निवेदने सादर कऊन बराच काळ लोटला तरी बांधकाम खात्याकडून त्याची दखली घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांचा नाईलाज झाला असून ज्यांना यापूर्वी डेंग्यू झाला होता, त्यांनी या परिस्थितीचा अधिकच धसका घेतला आहे. सध्या आरोग्य खाते व नगरपालिकेकडून डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती व विविध उपययोजना आखल्या जात आहेत. बांधकाम खात्याला या प्रकाराचे गांभीर्य वाटत नसल्यास निदान आरोग्य खात्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी पोलीस कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.









