वार्ताहर /येळ्ळूर
वाय. पी. एल ऑर्गनायझेशन कमिटी येळ्ळूर यांच्या वतीने आयोजित येळ्ळूर प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोरया स्पोर्ट्सने एस.आर.एस. संघाचा पराभव करुन येळ्ळूर प्रिमीयर लीग चषक पटकाविला.सदर स्पर्धेत निमंत्रित आठ संघांचा सहभाग होता. अंतिम सामना मोरया स्पोर्ट्स व एस. आर. एस. या संघात झाला. मोरया स्पोर्ट्सने विजेतेपद मिळविले तर एस. आर. एस. संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मोरया संघाचा परशराम कणबरकर तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून एस. आर. एस संघाचा अभिषेक पाटील यांना गौरविण्यात आले. येळ्ळूर ग्रा. पं. माजी अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, उद्योजक एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत विजेत्या संघाना बक्षीस देण्यात आले. यावेळी प्रसाद कानशिडे, मधू नांदुरकर, महेश चौगुले, अनंत चौगुले, प्रसाद मजुकर, प्रकाश पाटील, आदी पाटील यांच्यासह क्रीडाप्रेमी, खेळाडू व कमिटीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









