वार्ताहर/ येळ्ळूर
नुकत्याच पार पडलेल्या श्री चांगळेश्वर स्पोर्ट्स क्लब येळ्ळूर आयोजित फुल्लपिच क्रिकेट स्पर्धेमध्ये मोरया स्पोर्ट्स कणबर्गी संघाने सहारा स्पोर्ट्स संतिबस्तवाडचा पराभव करून श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर चषक व रोख 25 हजार रुपये बक्षीस पटकाविले. या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघांनी सहभाग घेतला होता.
सलग पाच दिवस सुरू असणाऱ्या या स्पर्धेमध्ये सहारा स्पोर्ट्स संतिबस्तवाडला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. त्यांना चषक व रोख 15 हजार रुपये देण्यात आले. यावेळी पुरस्कर्ते इंजिनिअर व श्रीराम बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे गोविंद रामचंद्र टक्केकर यांच्या हस्ते ही बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून मोरया स्पोर्ट्स कणबर्गीच्या अभिषेक पाटील यांना तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून याच संघांच्या विनायक यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून सहारा स्पोर्ट्स संतिबस्तवाडच्या राकेश यांना गौरविण्यात आले. याशिवाय श्री चांगळेश्वरी स्पोर्ट्स येळ्ळूर संघाच्या सदानंद पोटे यांना उत्कृष्ट यष्टीरक्षक, उमेश गोरल याला षटकारांच्या हॅट्ट्रिकसाठी तर उत्कृष्ट झेलसाठी आनंद यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी यल्लुप्पा पाटील, उत्तम मंगणाकर, नामदेव कदम उपस्थित होते. स्पर्धा पार पाडण्यासाठी अनंत बिजगरकर, उमेश गोरल, एकनाथ पोटे, हरिष पाटील, सदानंद पोटे, बसवंत कर्लेकर यांच्यासह चांगळेश्वरी स्पोर्ट्स क्लबच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.









