कमलेश बांदेकर यांची माहिती. आंतरराष्ट्रीय योगदिनची तयारी जोरात. राज्यभर हजारांवर योग शिक्षक तयार करणार. शिक्षकांची गरज असल्यास संपर्क साधावा.
डिचोली : येत्या 21 जून रोजी देशभर साजरा करण्यात येण्राया योग दिनाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू असून गोवा राज्यात यावर्षी एका लाखांवर लोकांना योगदानी योगमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. राज्यात पतंजली योग समितीतर्फे एक हजारांवर योगशिक्षक तयार करण्यात आले असून यावर्षी घराघरात योग पोहोचविण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती गोवा राज्य पतंजली योग समितीचे अध्यक्ष कमलेश बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे भारत देशासाठी एक अभिमानास्पद बाब आहे. गेल्यावर्षी गोव्यात 500 च्या वर कार्यक्रम गोवाभर झाले होते. विविध शिक्षण संस्था, ?पनी, सरकारी – निमसरकारी कार्यालये, क्लब, संस्था, महिला मंडळे, स्वयंसहाय्य गट व इतरांनी पतंजली समितीकडे संपर्क साधून योग शिक्षकांबध्दल विचारणा केली होती. सध्या राज्यभर 700 ते 800 योगशिक्षक वावरत असून गोव्यात योगाचा प्रसार ब्रयाचपैकी झालेला आहे. त्यातच जर कोणत्याही संस्था गटांना योग शिक्षकांची आवश्यकता असल्यास ते पतंजली योग समितीकडून निशुल्क उपलब्ध करून दिले जाणार आहे. असे कमलेश बांदेकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राज्य महिला प्रभारी संध्या खानोलकर, किसान पंचायत प्रभारी तुळशीदास मंगेशकर, सहराज्यप्रभारी विश्वास कोरगावकर, पतंजली युवा भारत प्रमुख सनी सिंह, संरक्षक राघव शेट्टी आदींची उपस्थिती होती.
21 जून हा अखेरचा दिवस धरून योग शिबिरे सुध्दा आयोजित करायची असल्यास कोणीही संपर्क साधू शकतात. त्यासाठी उत्तर गोव्यात तुळशीदास मंगेशकर (संपर्क क्र. 8888937827) तर दक्षिण गोव्यासाठी सुनील देसाई (संपर्क क्र. 9850631115) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही कमलेश बांदेकर यांनी केले आहे. योगदिनाला सरकारचेही मोठे पाठबळ मिळत असते. योग हे मनवी जिवनासाठी अमृत असून निरोगी जिवन जगतानाच समाजात एक चांगला व संयमी माणूस बनविण्याची ताकद योगात आहे, असे बांदेकर पुढे म्हणाले. महिलांच्या जिवनातही योगाचे फायदे अनेक असून आतापर्यंत झालेल्या योग शिबिरांमध्ये महिलांनी चांगली उपस्थिती दाखवली आहे. त्यासाठीच योगदानी महिलांनीही मोठ्या संख्येने बाहेर येत योड सादर करावा व इतरांनाही त्यासाठी प्रेरीत करावे, असे आवाहन महिला प्रभारी संध्या खानोलकर यांनी म्हटले. शेतक्रयांचे काम जरी मेहनतीचे असले तरी त्यांनाही आरोग्याच्या तक्रारी असतातच म्हणून त्यांनीही योग साधनेत सहभागी व्हावे, असे तुळशीदास मंगेशकर यांनी सांगितले. युवा हे देशाचे भविष्य असून या भविष्याचे आरोग्य तंदुऊस्त ठेवण्यासाठी योग हा एकमेव पर्याय आहे. नियमित व्यायखमाबरोबरच योगाला युवा पिढीने प्राधान्य द्यावे. दरदिवशी 45 मिनिटे योग केल्यास डॉक्टरांपासून कायमचे दूर ठेवण्याचे सामर्थ्य योगात आहे. त्यासाठी योगदिनी मोठ्या संख्येने युवांनीही सहभागी होऊन योग करावा व तो आपल्या जिवनात नियमित ठेवावा, असे आवाहन युवा प्रमुख सनी सिंह यांनी केले.









