अब्जावधींच्या गरजा पूर्ण करतात 50 हजार वन्यप्रजाती
जगभरात 50 हजार वन्यप्रजाती अब्जावधी लोकांच्या गरजा पूर्ण करतात. जगाचा निम्म्याहून अधिक जीडीपी निसर्गावर अवलंबून आहे, परंतु जैवविविधतेची हानी वित्तीय स्थिरतेसाठी मोठा धोका ठरली आहे. इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायवर्सिटी अँड इकोसिस्टीम सर्व्हिसेस (आयपीबीईएस)च्या अहवालानुसार केवळ वनांमध्ये 60 हजार वृक्षप्रजाती, 80 टक्के उभयचर प्रजाती आणि 75 टक्के पक्षी प्रजाती आढळून येतात, ज्या 1.6 अब्जाहून अधिक लोकां अन्न, औषध आणि उत्पन्नाच्या स्वरुपात नैसर्गिक भांडवल प्रदान करतात. संयुक्त राष्ट्रसंघानुसार सध्या जगभरात सुमारे 10 लाख प्रजाती विलुप्त होण्याचा धोका आहे, कारण जैवविविधता आणि पर्यावरणीय व्यवस्था पूर्णपणे प्रभावित होत आहे, मानवी हालचालींमुळे होत असलेल्या हवामान बदलामुळे पृथ्वीचे तापमान औद्योगिक पूर्व काळाच्या तुलनेत शतकाच्या अखेरपर्यंत 2.7 अंशांनी वाढू शकते. यामुळे विलुप्त होणाऱ्या वाटेवर असलेल्या प्रजातींसाठी 10 पट धोका वाढणार आहे.
जंगली प्रजातींमुळे लोकांना फायदा
जंगली प्रजाती आणि त्यांच्या पारिस्थितिक तंत्राचे रक्षण केल्याने लाखो लोकांची उपजीविका सुरक्षित होईल असे अहवालात म्हटले गेले आहे. याचबरोबर जंगली रोपे, शेवाळ जगाच्या 20 टक्के लोकसंख्येच्या भोजनचा हिस्सा आहे. जगात आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांपैकी 70 टक्के लोक जंगली प्रजातींवर थेट स्वरुपात निर्भर आहेत. हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे.









