त्यामुळे लोकसभेवर भाजपचाच झेंडा – नितेश राणे
कणकवली /प्रतिनिधी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी कोणी इच्छुक असणे वाईट नाही. मात्र उमेदवार कोण द्यावा हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. या मतदारसंघाचे आकडे बोलके आहेत.माजी खासदार निलेश राणे स्वाभिमान पक्षातून लढले तेव्हा पावणेतीन लाख मते आम्हाला मिळाली होती. त्यावेळी साडेतीन लाख मतं भारतीय जनता पार्टीची होती. निलेश राणे यांची पावणेतीन लाखमते आणि भाजपची मते अशी आकडेवारी आणि गेल्या पाच वर्षात भाजपने केलेले काम पाहता ६ लाख पेक्षा जास्त मते या मतदारसंघात भाजपची आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले