पहिल्या 6 राज्यांमध्ये विक्री 75टक्क्यापेक्षा अधिक ः वर्षात आतापर्यंत 5 लाखावर झाली टॅक्टर विक्री
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या ट्रक्टर उद्योगाने सप्टेंबर 2022 मध्ये 53,310 युनिट्सच्या विक्रीचा विक्रम नोंदवला आहे. यामध्ये प्रामुख्याने गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, बिहार आणि कर्नाटक ही पहिली 6 राज्ये अव्वलस्थानी राहिली आहेत. ज्यांनी देशभरातील एकूण ट्रक्टर विक्रीत 75 टक्क्यांचा वाटा उचलला आहे.
ट्रक्टर जंक्शनच्या डिजिटल मार्केट पोर्टलद्वारे ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार, वर्ष 2022च्या पहिल्या 9 महिन्यात एकूण ट्रक्टर विक्री सुमारे 5.16 लाख युनिट्सची राहिली आहे, ज्यामध्ये ऑगस्ट 2022 महिना वगळता मासिक विक्री 50,000 युनिट्सपेक्षा जास्त दिसून आली आहे.
महिंद्रा ट्रक्टर विक्रीत आघाडीवर
सप्टेंबर महिन्यातील नोंदणीकृत विक्रीचे आकडे महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर 2.19 टक्क्यांनी वाढले आहेत. सप्टेंबरमध्ये महिंद्राने सर्वाधिक ट्रक्टर विक्री नोंदवली, त्यानंतर स्वराज ट्रक्टर, मॅसी फर्ग्युसन, सोनालिका ट्रक्टर, एस्कॉर्ट्स, जॉनडीरे आणि इकार मोटर यांचा क्रमांक लागतो.
ट्रक्टरची विक्री दर महिन्याला वाढली
ट्रक्टर जंक्शनचे संस्थापक रजत गुप्ता म्हणाले, ‘सप्टेंबर महिन्यात ट्रक्टरची विक्री दर महिन्यानुसार पाहता वाढली आहे. यंदाच्या पावसाळ्याच्या पहिल्या काही महिन्यात तसेच नंतर सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यामुळे ट्रक्टर विक्रीत वाढ झाली. ट्रक्टर आणि इतर कृषी अवजारांची विक्री ही ग्रामीण भागासाठी महत्त्वाची मानली जाते.
कंपनीनुसार ट्रक्टरची विक्री
(काही निवडक कंपन्यांची आकडेवारी)
ब्रँड सप्टेंबर 2022 सप्टेंबर 2021
महिंद्रा………… 12,242…… 11,769
स्वराज………… 8,569…….. 8,682
मॅसी फर्ग्युसन… 6,798…….. 6,126
सोनालिका…… 6395……… 6488
एस्कॉर्ट्स……… 5303……… 5481
जॉन डीयर…… 4358……… 4652
आयशर……….. 3130……… 2767
न्यू हॉलँड…….. 2163……… 2176
कुबोटा………… 1422……… 1337
व्हीएसटी 535 503









