वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी पहिल्या शूटिंग लीग ऑफ इंडियामध्ये (एसएलआय) बरीच उत्सुकता निर्माण होत आहे. कारण 400 हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आधीच नोंदणी केली आहे, असे आयोजक नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (एनआरएआय) बुधवारी सांगितले.
भारत, कझाकस्तान, रशिया, इराण, हंगेरी, क्रोएशिया, अझरबैजान, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, ग्रेनाडा, इटली, ऑस्ट्रीया, सर्बिया, अमेरिका, स्पेन, थायलंड, जर्मनी, झेक प्रजासत्ताक, नॉर्वे, सॅन मारिनो आणि रोमानिया येथील नेमबाजांनी या लीगसाठी नोंदणी केली आहे. ही संख्या वाढतच आहे. आपला उत्साह व्यक्त करताना एनआरएआयचे अध्यक्ष कलिकेश नारायण सिंग देव म्हणाले, आम्हाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि नोंदणीच्या संख्येमुळे आम्हाला खरोखर आनंद झाला आहे. भारताच्या शूटिंग लीगसाठी आमच्या दृष्टिकोनाचे हे एक मजबूत प्रमाण आहे. आमचे उद्दिष्ट नेहमीच एक जागतिक दर्जाचे व्यासपीठ तयार करणे हे असून जे प्रतिभेचे उत्सव साजरा करेल, निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन देईल आणि नेमबाजांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देईल.
नोंदणी प्रक्रिया जुलैच्या मध्यापर्यंत खुली आहे. एसएलआयच्या पहिल्या हंगामात 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान एक विंडो असेल आणि एनआरएआय तांत्रिक समितीने सांगितल्याप्रमाणे पिस्तुल (10 मी., 25 मी.), रायफल (10 मी., 50 मी., 3 पोझिशन्स) आणि शॉटगन (ट्रॅप आणि स्कीट) या मिश्र सांघिक स्पर्धांचा समावेश असेल. लीग टप्प्यात दोन पूलमध्ये विभागलेल्या या स्पर्धेत किमान सहा संघ सहभागी होतील. खेळाडूंची निवड केली जाईल आणि त्यांना एलिट चॅम्पियन, वर्ल्डएलिट, नॅशनल चॅम्पियन आणि ज्युनियर आणि युथ चॅम्पियन चार स्तरांमध्ये गटबद्ध केले जाईल. जेणेकरुन अनुभव आणि उदयोन्मुख प्रतिभेचे स्पर्धात्मक मिश्रण सुनिश्चित होईल.









