पत्नीला 120 वेळा घेऊन गेला हनिमूनवर
विमानाचे तिकीट बुक करताना आपण शंभरवेळा विचार करत असतो. परंतु जगात एक असा व्यक्ती आहे, ज्याने 4 कोटी किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा विमानप्रवास केला आहे. या इसमाने स्वत:च्या पत्नीला 120 पेक्षा अधिक वेळा हनिमूनवर घेऊन गेला आहे आणि ते देखील मोफत. हा व्यक्ती अजूनही विमानप्रवास करणे थांबविण्याचे नाव घेत नाही. तो पूर्ण जीवन विमानातून प्रवास करू इच्छितो. अमेरिकेत राहणारे 69 वर्षीय टॉम स्टुकर यांनी 1990 मध्ये युनायटेड एअरलाइन्सचा एक पास खरेदी केला होता. त्यावेळी या पासची किंमत 290 हजार डॉलर्स म्हणजेच आजच्या किमतीनुसार सुमारे 2.37 कोटी रुपयांचा होता. हा पास खरेदी करणाऱ्याला एअरलाइन्सच्या कुठल्याही उ•ाणात आजीवन मोफत प्रवास करण्याची संधी एअरलाइन्सने दिली होती. या ऑफरचा टॉम यांनी आतापर्यंत पुरेपूर लाभ घेतला आहे. त्यांना या ऑफर अंतर्गत स्वत:च्या पसंतीची सीट 1 बी मिळाली असून त्यावर बसून त्यांनी 4 कोटी किलोमीटरहू अधिक अंतराचा हवाईप्रवासाचा आनंद घेतला आहे.
पासमध्ये आणखी काही सुविधा
या पासमध्ये आणखी बऱ्याच सुविधा देण्यात आल्या होत्या. जगभरातील आलिशान हॉटेल्समध्ये वास्तव्याचा, हायएंड रेस्टॉरंटमध्ये विशेष भोजन आणि हिंडण्याचा खर्च देखील एअरलाइन्सच करत आहे. टॉम यांनी एकदा नेवार्क ते सॅन फ्रान्सिस्कोसाठी विमानप्रवास केल्यावर सलग 12 दिवसांपर्यंत ते प्रवास करत होते. त्यानंतर ते बँकाँकहून दुबई आणि दुबईहून बँकॉकमध्ये परतले होते. आतापर्यंत जगभरात त्यांनी या पासाद्वारे विमान प्रवास केला आहे.
हवाईप्रवासाची उत्सुकता
एक आठवड्यापेक्षा अधिक काळ कुठे थांबल्यास चुकीचे करतोय असे मला वाटू लागते. याचमुळे मी पुन्हा विमानप्रवासास सुरूवात करतो, असे ते सांगतात. स्टुकर यांनी स्वत:च्या अमर्यादित युनायटेड पासचा वापर करत 100 हून अधिक देशांना भेट दिली आहे. याचबरोबर स्वत:च्या पत्नीला 120 पेक्षा अधिक वेळा हनिमूनला घेऊन गेले आहेत. टॉम हे 300 हून अधिकवेळा ऑस्ट्रेलियात गेले आहेत. मी प्रवासासाठी प्रवास करतो. काम किंवा सुटीसाठी नाही असे टॉम यांचे सांगणे आहे.









