सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी माऊलीच्या आज होणाऱ्या वार्षिक जत्रोत्सवासाठी सावंतवाडी आगारातून ज्यादा एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत . सावंतवाडी आगारातून चार जादा बसेस तर बांदा व मळेवाड येथून प्रत्येकी दोन अशा आठ जादा गाड्या भाविकांच्या सेवेसाठी सोडण्यात येणार आहेत. या बसेस व्यतिरिक्त भाविकांच्या उपलब्धतेनुसार आणखी गाड्या सोडण्याची व्यवस्था केली आहे. आगारातून गुरुवारी सकाळी आठ वाजता पहिल्या स्पेशल माऊली जत्रोत्सव एसटी बसचा शुभारंभ ज्येष्ठ महिला भाविक यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापक निलेश गावित, बस स्थानक व आगारातील अधिकारी, वाहतूक निरीक्षक, कर्मचारी व भाविक उपस्थित होते. तसेच सोनुर्ली जत्रोत्सव येथेही भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी स्वतंत्र वाहतूक निरीक्षक कक्षाची व्यवस्था व सावंतवाडी आगाराच्या आवारातही स्वतंत्र नियंत्रक कक्ष व्यवस्था केली आहे. भाविकांनी ज्यादा जत्रा गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आगारातर्फे करण्यात आले आहे.









