संसदीय समितीची शिफारस : मनुष्यबळही वाढवावे लागणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेश विषयक संसदीय समितीने जगात भारताची सॉफ्ट पॉर वाढविण्यासाठी विदेश मंत्रालयाच्या स्तरावर अधिक निधीची गरज असल्याचे म्हटले आहे. भारत जागतिक स्तरावर एक मोठी भूमिका पार पाडू इच्छित असताना हे आवश्यक असल्याचे समितीचे म्हणणे आहे. 2025-26 वर्षासाठी मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवर विदेश सचिव विक्रम मिसरी यांच्या ब्रीफिंगदरम्यान समितीने मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण आणि मनुष्यबळ वाढविण्यावरही जोर ला आहे.विदेश मंत्रालयाची शक्ती वाढविली जावी असे मत अनेक खासदारांनी व्यक्त केले आहे. सर्व संबंधित घटकांनी यावर काही प्रमाणात सहमती दर्शविली आहे. तर मंत्रालयाकडून निधी पुरविण्यात साधनसामग्रीसंबंधी काही अडथळे आहेत असे वक्तव्य संसदीय समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी बैठकीनंतर बोलताना केले आहे. परंतु समितीच्या शिफारसींविषयी तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.
समितीने मंत्रालयाचा बजेट दस्तऐवज पाहणे आणि दिवेशात भारताचा आवाज भक्कम करण्यासाठी याच्या गरजांवर मिसरी यांना प्रश्न विचारण्यास अत्यंत रुची दाखविली. भारत 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वासाठी निवडणूक लढविणार असल्याचे मिसरी यांनी समितीला सांगितले असल्याची माहिती थरूर यांनी दिली आहे.









