कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कोल्हापुरी मांसाहारी जेवणाला खूप मोठी परंपरा आहे. कोणत्याही अनावश्यक बाह्य पदार्थांचा वापर न करता गच्च भरलेले मांसाहारी जेवणाचे ताट हा कोल्हापुरी जेवणाचा आत्मा आहे. या जेवणात मसाल्यांना महत्त्व आहे, पण त्याहीपेक्षा जो जेवण करतो, त्याच्या हातगुणाला त्याहून अधिक महत्त्व आहे. अस्सल कोल्हापुरी हॉटेल व्यवसायिकांनी हे वेगळेपण जरूर जपले आहे. त्यामुळेच आजही तेथे अस्सल कोल्हापुरी जेवणासाठी वेटिंग आहे.
मांसाहारी जेवणाची परिस्थिती पाहता ‘कोल्हापुरी मांसाहारी, कोल्हापुरी तांबडा–पांढरा’ याची नको ती प्रसिद्धी होत आहे. चवीला हे जेवण कसे, यापेक्षा या जेवणाचे ताट सजवण्यावर भर दिला जात आहे आणि कोल्हापुरी खाद्य संस्कृतीशी जे कधी जुळलेले नाही, त्याचाच अधिक मारा सुरू आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यांना नक्कीच कोल्हापुरी पांढरा–तांबड्याचे आकर्षण आहे. पण त्यांना पांढरा तांबड्याच्या नावाखाली जे काही मिळते, ते काय आहे? याचा विचार होण्याची गरज आहे.कोल्हापुरी मांसाहारात मटण हा भाग जितका महत्त्वाचा महत्वाचे हे की कोल्हापुरी जेवणात पांढरा रस्सा हा मूळ प्रकार अजिबात नाही. कोल्हापुरात बहुतेक घरात रविवार, बुधवार, शुक्रवार या तीन दिवशी आणि छोटे-मोठे निमित्त मिळाले की त्या दिवशी मांसाहाराचा काहीनी खूप विचित्र प्रकारे घेतला आहे. कोल्हापुरी जेवण या नावाखाली इतर पदार्थांचीच रेलचेल आहे. एका थाळी बरोबर दुसरी थाळी फ्री, अनलिमिटेड पांढरा-तांबडा रस्सा, 500 रुपयात अनलिमिटेड थाळी, चुलीवरची भाकरी, चुलीवरचप् रस्सा, अशा घोषणांची रेलचेल आहे. पर्यटक त्याला भुलला नाही तर ते नवल आहे. याशिवाय शिवाजी चौकात ग्राहकाला आपल्या हॉटेलमध्ये खेचण्यासाठी स्पर्धा आहे. ती कोल्हापुरी जेवणाचा अक्षरश: अवमान करणारी.
काही हॉटेलवाले जे देतील, त्याला कोल्हापुरी म्हणायची वेळ आली आहे. मूळ परंपरा जपणारे हॉटेलचालक आजही कोल्हापुरात आहेत. त्यांनी कोल्हापुरी जेवणाचे सत्व जपले आहे, पण या शोबाजीच्या जमान्यात मूळ कोल्हापुरी थोडी बाजूला पडली आहे.
- चव जपलीच पाहिजे
झणझणीतपणा आणि चव हे कोल्हापुरी जेवणाचे वैशिष्ट्या आहे. जेवणासाठी वापरली जाणारी चटणी आणि मसाले खूप महत्त्वाचे आहेत. ती बाजू हॉटेलचालकांच्या घरातील महिलांनी जपली आहे. पण ज्याला हे माहीतच नाही ते शोबाजी करून व आपापसात इर्षा करून कोल्हापुरी जेवणाची गंमत हरवत आहेत.
अनिल पाटील.
- पर्यटनाच्या व्यवसायात आहोत
, पर्यटन पांढऱ्या तांबड्या रस्स्याची जाहिरात पाहून प्रथम त्या जेवणाला प्राधान्य देतात. पण काही ठराविक घरगुती किंवा जुनी हॉटेल सोडली तर अन्य ठिकाणी कोल्हापुरी जेवणाची मूळ चव हरवली आहे. ती जपायलाच हवी.
–कृष्णराव माळी, पर्यटन व्यावसायिक.








