पुणे / प्रतिनिधी :
महिला धोरणात आणखी अनेक बदल करण्याची गरज असून, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी सांगितले.
वारजे येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले, आमचे सरकार असताना महिलांना सन्मानाने जगता यावे म्हणून अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मुलींना हिस्सा दिला तर कौटुंबिक वाद होतील, असे आमचे लोक सांगायचे. पण त्याचा फायदा मी समजून सांगितला आणि महिला आरक्षणाचा कायदा पास झाला. लष्करातदेखील आम्ही मुलींना स्थान दिले. त्यावेळीही विरोध झाला. मात्र. त्याला न जुमनता मी संरक्षणमंत्री असताना निर्णय घेतला आणि आता मुलीही पायलट दिसू लागल्या आहेत. त्यामुळे मुलींना कमी लेखू नये. मुली अनेक गोष्टी करू शकतात. त्यासाठी अजूनही महिला धोरणात बदल करणे गरजेचे आहे.








