श्री बलराम स्पोर्ट्सतर्फे मिनीमॅरेथॉन
बेळगाव : श्री बलराम स्पोर्ट्स क्लब, बेळगाव आयोजित व राजू काणकोणकर पुरस्कृत सलग 33 वर्षे प्रजासत्ताक दिनी एकता, राष्ट्रीय एकात्मता, शांतता व जातीय सलोखा संदेशाप्रित्यर्थ क्रॉसकंट्री ‘मिनीमॅरेथॉन’ स्पर्धा उत्साहात झाल्या. सदर स्पर्धेचा शुभारंभ अध्यक्ष अॅड. धनराज गवळी यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आले. बलराम स्पोर्ट्स क्लब सातत्याने दरवर्षी 26 जानेवारीला मिनीमॅरेथॉनचे आयोजन करते.
या स्पर्धेतील निकाल पुढील प्रमाणे
खुला गट पुरुष- 1) नैतिक रायकर, 2) समीर गवळी, 3) सोहम ढवळे, 4) श्लोक नांगरे, 5) प्रितेश ढवळी, महिलां विभाग- 1) सृष्टी भवानी, 2) सोनाली गवळी, 3) पूर्वा चौधरी, 4) अक्षता गवळी, 5) खुशी गवळी.
आठवीपर्यंतचा गट, मुलांच्या विभागात 1) सौरभ ढवळे, 2) पुष्कर नांगरे, 3) अथर्व ढवळे, 4) आरुष गवळी, 5) वेदांत गवळी, मुलींच्या विभागात 1) संस्कृती भवानी, 2) आरुषी भवानी, 3) ललिता भवानी, 4) लावण्या भवानी, ज्युनियर गट 1) अराध्या गवळी, 2) दिप्ती भवानी, 3) जान्वी गवळी, 4) अनन्या हिरेमठ.
बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गजानन गवळी, प्रकाश भवानी, कृष्णा गवळी, सुजाता गवळी, लिला गवळी, रितीका गवळी, शेखर गवळी, अॅड. रोहन गवळी, अॅड. राहुल गवळी, अॅड, हर्षा गवळी व अध्यक्ष अॅड. धनराज गवळी यांच्या हस्ते पार पडला.सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी रोशन गवळी, अगतसिंग दावले, प्राची भवानी, रश्मी गवळी, सुहानी गवळी, प्रियांका भवानी यांनी बरेच परिश्रम घेतले.









