कोल्हापूर :
रेकॉर्डवरील दोघा गुन्हेगारांनी एका तऊणाला चाकूचा दाखवित, त्याला मारहाण कऊन, त्याची मोपेड जबरदस्तीने हिसकावून घेऊन पोबारा केला. ही घटना शहरातील सदर बाजार परिसरात बुधवारी रात्री उशिरा घडली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात रेकॉर्डवरील गुन्हेगार पियुष पोवार, आदर्श गायकवाड याच्या विरोधी गुन्हा दाखल झाला. त्यांचा शोध सुरु आहे.
शहरातील कावळा नाका येथील मैथीली अपार्टमेंटमध्ये राहणारा अशोक आण्णाप्पा खांडेकर हा तऊण बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हॉटेल लिशा समोरील पान शॉपमध्ये खाऊचे पान आणण्यासाठी मोपेडवऊन आला होता. तो पान घेऊन मोपेडजवळ आला. त्यावेळी त्याला त्याच्या मोपेडवर एक तऊण बसलेला तर दुसरा तऊण उभा असलेला दिसून आला. त्या दोघांनी त्याला माझे थोडे काम आहे. गाडीवर बसा, असे सांगून त्याला त्याच्या मोपेडवऊन शहरातील ऊईकर कॉलनी येथील एल.आय.सी मैदानावर आणले. त्याला चाकूचा धाक दाखवून, बेदम मारहाण केली. त्याच्या खिशातील पाकीट काढून घेतले. त्यानंतर त्याला धाक दाखवून सिध्दार्थ चौकातील केकजी बेकरी जवळ आणले. त्याला ठार मारण्याची धमकी देत त्याची मोपेड जबरदस्तीने हिसकावून घेऊन पोबारा केला. या घडल्या प्रकाराबाबत खांडेकर याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडल्या प्रकाराविषयी माहिती दिली. त्यावऊन पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. त्यामध्ये हा सर्व घटनाक्रम कैद झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजची पडताळणी केली असता हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार पियुष पोवार आणि गुन्हेगार आदर्श गायकवाड या दोघांनी केल्याचे उघड झाले. त्यावऊन त्या दोघा गुन्हेगाराविरोधी विविध कलमान्वे गुन्हा दाखल केला. या दोघाविरोधी शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वऊपाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.








