पेडणेतील टॅक्सी व्यवसायिक संभ्रमात : काऊंटरबाबत प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची वाहतूक अधिकाऱ्यांकडून माहिती
पेडणे : मोपा विमानतळावर अचानक मंगळवारी सकाळी सुरू केलेला स्थानिकांसाठी असलेला टॅक्सी काऊंटरच्या शुभारंभाचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले. आणि तासाभरानंतर अचानक बंद झाला. त्यामुळे स्थानिक टॅक्सी व्यवसायिक तसेच संघटनेचे पदाधिकाऱ्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत टॅक्सी असोसिएशनचे नेते सुदीप ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली टॅक्सी बांधव संघटनेच्या पदाधिकारी ऊपेश कुम्ररलकर, राजू नर्से आदींनी पेडणे वाहतूक साहाय्यक संचालक कमलाकांत कारापूरकर यांची भेट घेऊन जाब विचारला. यावर काऊंटर सुरू झाल्यानंतर आपल्याला पंचायत आणि मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी बोलावून घेतले. त्यामुळे आपण त्याठिकाणी गेलो व काउंटर उघडला. मात्र या ठिकाणी नोटीफाय करण्याची प्रक्रिया सुरू असून ती झाली नसल्याचे कारापूरकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक सहाय्यक संचालक कारापूरकर यांची भेट घेऊन त्यांना काऊंटर बंदबाबत विचारणार केली, अस सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले, यावर त्यांनी आपल्या काऊंटर सुरू करण्याबाबत सरकारकडून आदेश आला नसल्याचे सांगितले. आदेश नसताना टॅक्सी काऊंटर का सुरू केला? असा प्रश्न आपण त्यांना केला असता याबाबत कंपनीने आम्हाला बोलावलं म्हणून आपण गेलो मात्र सरकारकडून याबाबत कुठलाही आदेश आला नाही आणि ही प्रक्रिया सुरू असून ब्ल्यू टॅक्सी काऊंटर प्रक्रिया सरकार दरबारी सुरू आहे आणि तो नोटिफाय होण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे कारापूरकर यांची सांगितल्याचे ताम्हणकर यांनी स्पष्ट केले. टॅक्सी काऊंटरबाबत आपण जी याचिका न्यायालयात दाखल केली होती ती बुधवारी सुनावाणी होणार असल्याची माहिती, यावेळी सुदीप ताम्हणकर यांनी दिली.









