Moong Dal Benefits For Diabetes: देशात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे दिसत आहे. याला कारणीभूत म्हणजे बदलेली लाईफस्टाईल. मधुमेहामध्ये केवळ वृद्धच नाही तर तरुणही आता या आजाराला बळी पडत आहेत. यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. अशावेळी योग्य आहार घेऊनही तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता.
डॉक्टरांच्या मते खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतली तर औषधांची गरज कमी होते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांना भात, रोटी इत्यादी कमी खाण्याचा सल्ला दिला जातो आणि मसूर जास्त प्रमाणात खाण्यास सांगितले जाते. पण त्यातही साखर असणाऱ्या रुग्णांसाठी कोणती कडधान्ये फायदेशीर असतात याची माहिती तुम्हाला असणे गरजेची आहे. मधुमेह कमी करण्यासाठी तुम्ही मुगडाळीचा वापर करू शकता. ती नेमकी कशी वापरावी याविषयी जाणून घ्या.
मूगडाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे
मूग डाळीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. याशिवाय, मूग डाळ हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न आहे जे शरीरातील इन्सुलिन, रक्तातील साखर आणि चरबीचे प्रमाण कमी करण्यास उपयुक्त आहे.
मधुमेहाच्या रुग्णांनी अशा प्रकारे मूग डाळीचे सेवन करावे
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मूग डाळ बनवूनही खाऊ शकता. पण डॉक्टर मूग दुसर्या प्रकारे खाण्याचा सल्ला देतात, म्हणजे मोड आलेले मूग. तुम्ही असही करू शकता. किंवा मूग रात्रभर भिजत ठेवा.सकाळी पाण्यातून बाहेर काढून तुम्ही खाऊ शकता.
Disclaimer: ही माहिती आयुर्वेदिक प्रिस्क्रिप्शनच्या आधारे लिहिली गेली आहे. याचा तरूण भारतशी काहीही संबंध नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









