यंदा मान्सून दरवर्षीपेक्षा लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे अनेकांनी पावसाची तयारी सुरु केली असेल. छत्री, रेनकोट शोधण्याची धावाधाव आता सगळ्यांची घरी पाहायला मिळेल. कुठे छत्री रिपेअरी तर कुठे यंदा नविन रेनकोट घ्यायची तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे शेतकरी शेत नांगरणी करून पेरणीच्या तयारीला लागला आहे. मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या संपत आल्याने आईची जूनच्या शाळा सुरु होण्याची तयारीची धांदल उडली आहे. हे सर्व करत असताना तुमच्या डायरीत कुठेतरी आरोग्याचीही नोंद करून ठेवा. काही गोष्टीची आधीच तयारी असेल किंवा थोड प्लॅनिंग जर केले तर तुम्हाला पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून बचाव करता येईल. यासाठी जाणून घेऊया काही ट्रिक्स आणि टिप्स चला तर ..
याची काळजी घ्या
खरंतर लहानपणापासून आपण घरात आजी-आई कडून काही टिप्स एेकत आलो आहोत. त्या म्हणजे बाहेरून आले की हात-पाय स्वच्छ धुणे. आपल्याला या गोष्टी माहित असताना दिवसभर काम केल्यानंतर संध्य़ाकाळी घरी आल्यानंतर लगेच बेडवर रेस्ट घेण्याची अनेकांची सवय असते. मात्र याचा तोटा आपल्याला होता. बाहेर प्रवास करत असताना बॅक्टेरिया, वायरस आपण नकळत सोबत घेऊन येत असतो. त्य़ामुळे त्याचा त्रास आपल्या सोबत घरातील लहान मुलांना होत असतो. यासाठी पावसाळ्यात याची काळजी घ्या. याशिवाय तुम्ही सॅनिटायझर वापरू शकता.
हे पदार्थ टाळा
पावसाळ्यात आपली रोग प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तसेच बॅक्टेरिया, वायरसेसचे वाढलेले प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. त्य़ामुळे रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्न खाणे टाळा. पावसाळ्यात माश्यांचे प्रमाण जादा असते. त्या उघड्या ठेवलेल्य़ा अन्नावर बसतात. हेच पदार्थ खाल्याने पोटाचे विकार होऊ शकतात.
पाणी उकळून प्या
पावसाळ्यात पाण्यातून अनेक आजार उध्दभवू शकतात त्यामुळे पाणी उकळून प्या. पावसाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे देखील अनेक व्याधी उध्दभवू शकतात. यासाठी अलार्म लावून ठेवा आणि दिवसभरात ३ लिटर पाणी प्या.
योग्य आहार घ्या
पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. रोगप्रतीकार शक्ती वाढवण्यासाठी सकस, शुद्ध, पोषक घरचे अन्नच खावे. आपल्या रोजच्या आहारात भाज्या, फळांचा भरपूर समावेश करा. मसाल्याचे पदार्थ सुद्धा पचनाला मदत करतात. पण पावसाळ्यात खूप तिखट पदार्थ खाणे टाळावे.
त्वचेची काळजी घ्या
पावसाळ्यात त्वचेचे इन्फेक्शन टाळण्यासाठी जेवणात कडू भाज्यांचा समावेश करा. आठवड्यातून किमान एकदा मेथी, कार्ले, कडुलिंब ह्या भाज्यांचा समावेश आहारात करा. यामुळे चेहऱ्याचा टवटवीतपणा टिकून राहण्यासाठी मदत होते.
तळलेले, मांसाहारी पदार्थ टाळा
पावसाळ्याच्या दिवसात हलका आहार घ्या.शक्यतो तळलेले पदार्थ खाणे टाळा. पावसाळ्यात पचनसंस्था थोडी अशक्त झालेली असते त्यात जर खूप क्लिष्ट आणि पचायला जड पदार्थ खाल्ले तर आजारी पडण्याची शक्यता असते. दिवसभरात मधल्या वेळेत जेव्हा भूक लागेल तेव्हा गरम सूप, हर्बल टी, ग्रीन टी अशी पेय घ्या. पावसाळ्यात बाजारातील शीतपेय पेय घेणे टाळावे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









