सातारा :
कधी नव्हे ते आक्रित घडलं, कडक उन्हाळा असणाऱ्या मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने धिंगाणा घातला आहे. त्यामुळे मे मध्येच जुलैसारखे वातावरण झालेय. याचाच फायदा उठवत विकेंडचा मुहूर्त साधत पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा आनंद लुटला. या बदलेल्या निसर्गाच सजलेले रूप पाहण्यासाठी पर्यटक कास-यवतेश्वर येथे गर्दी करत आहेत. यातच रविवार हा सुट्टीचा दिवस आल्याने दिवसभर कास परिसरात गर्दी होती. तर काही युवकांची हुल्लडबाजी पहायला मिळाली. यामुळे कोणता अनचित प्रकार घड्डु नये म्हणून पोलिसांनी बॉ च ठेवण्याची गरज आहे.
गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणे बहरून निघाली आहेत. यात प्रमुख आकर्षण असणाऱ्या कास-यवतेश्वरला पर्यटक गर्दी करत आहेत. अशीच गर्दी रविवारी सकाळपासून होती. पावसाच्या हलक्या सरी, धुक्यांची चादर आणि पडणारे छोटे धबधबे पाहण्यासाठी अनेकांनी आपल्या कुंटुंबासमवेत कासला हजेरी लावली. पावसात भिजण्याचा आनंद घेत फोटो काढून या क्षणांना कॅमेऱ्यात कैद केले. तरुण-तरुणींही आपल्या मित्र परिवारासोबत फिरण्याचा आनंद घेण्यासाठी दुचाकीवरून आले होते. यातील काही युवक हुल्लडबाजी करताना दिसत होते. वेगाने गाडी चालवून, जोरात आरडाओरडा करत होते. तर घाटातील रस्त्याच्या कडेला गाडी लावून गाण्यावर नाचत व्हिडिओ काढत होते. कठड्यावर उभे राहून फोटो काढत होते. या उत्साहाच्या भरात कोणताही अनुचित प्रकार घडु शकतो. हे त्यांच्या लक्षात येत नाही. यामुळे त्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. मे महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने ऐन पावसाळ्यात पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी बाढणार आहे.








