ऑनलाईन टीम/तरुण भारत
केरळमध्ये वेळेआधीच मान्सून दाखल झल्यानंतर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात (maharashtra) मान्सून दाखल होणार आहे. मात्र, मुंबईकरांना पावसासाठी आणखी आठवडाभर प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यानुसार मुंबईत मान्सून (Monsoon) १० जूननंतर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, वेळेआधीच केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढच्या दोन दिवसांत कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. एरवी ७ जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावर्षी तीन-चार दिवस आधीच कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. केरळपासून (keral) नंतर कर्नाटकपर्यंत (karnatak) पोहोचलेल्या मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे दोन दिवसांत तो गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होऊ शकतो, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. असं असलं तरी मुंबईकरांना मात्र आणखी आठवडाभर मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सून 10 जूननंतरच मुंबईत येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.