Monsoon Session 2022 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. फिफ्टी फिफ्टी चलो गुवाहटी असं म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आजही टीका केली आहे. विरोधकांनी 50-50 बिस्किट पुडे दाखवत निदर्शने केली. यावेळी शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. खरे मुख्यमंत्री कोण आहेत हेच स्पष्ट होत नाही अशी बोचरी टीका केली आहे.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “हे सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. अजूनही गोविंदांना जाहीर केलेली मदत मंडळापर्यंत पोहोचली नाही. सरकारने गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण जाहीर केलं आहे पण त्यांना हे आरक्षण कसं मिळणार याचं स्पष्टीकरण सरकारने द्यावं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच शिंदे गटावर टिका करताना ते म्हणाले, जे गद्दार आहेत तर त्यांना गद्दारच म्हणावं लागेल, भाऊ असते तर भाऊच म्हणालो असतो असा टोला लगावला.
शिंदे-फडणवीस सरकारवर टिका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही सरकारला राज्यात ओला दुष्काळ लागू करण्याची मागणी केली होती पण सरकारने अद्याप ती लागू केली नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतही केली नाही. मग हे सरकार फक्त धूळफेक करतंय का? पुण्यातील देखाव्यासाठी परवानगी नकारणे हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न करत या सरकारने जनतेच्या एकासुद्धा प्रश्नाला हात घातला नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








