पुणे / प्रतिनिधी :
Monsoon out of India in two days नैऋत्य मोसमी वारे येत्या दोन दिवसांत संपूर्ण देशातून माघारी फिरणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी दिली. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता येत्या 24 तासांत वाढणार आहे.
परतीचा मान्सून शुक्रवारी विदर्भ, छत्तीसगड, ओरिसा, उत्तर बंगालचा उपसागर, तेलंगणा, आंध्रचा काही भाग, मध्य बंगालच्या उपसागरातून माघारी फिरला आहे. पुढील 48 तासांत मान्सून देशाच्या बाहेर जाण्यासाठी अनुकूल स्थिती आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
अधिक वाचा : कोरोनावरील 100 दशलक्ष लशी मुदतबाह्य
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे येत्या 24 तासांत तीव्र दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होईल. ओरिसाला बगल देऊन हे क्षेत्र 25 ऑक्टोबरच्या आसपास पश्चिम बंगाल-बांग्लादेशच्या किनारपट्टीकडे सरकेल, असा अंदाज आहे.