ऑनलाईन टीम
राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यातच आता संपूर्ण कोकण म्हणजेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रालाही रेड अॅलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली जिल्ह्यांतही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर 50 ते 60 किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. 23 तारखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, मुंबईत झालेल्या तुफान पावसामळे झालेल्या दुर्घटनांत रविवारी ३३ जणांना जीव गमवावा लागला आहे. हवामान खात्याचा इशारा लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून आपत्ती व्यवस्थापनासाठी निर्देश दिले आहेत.
Previous Articleसंसदेबाहेर शिरोमणी अकाली दलाचं कृषी कायद्यांविरोधात आंदोलन
Next Article अनिल देशमुख गायब; ईडीकडून शोध सुरू








