कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्याने सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चोवीस तासांपासून पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले जवळ वानरांचा एक कळप पुराच्या पाण्यात अडकला होता. पोटात अन्न नसल्याने पिलांसह वानरांची आरडाओरड सुरु होती. या घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला मिळताच त्यांनी तात्काळ या वानरांची सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार.
कोल्हापुरात गेली चार दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. धरणाक्षेत्रात पाणीसाठा वाढल्य़ाने मोठ्या प्रमाणात पाण्य़ाचा विसर्ग सुरु आहे. यामुळे कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळी पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले जवळ एक वानरांचा कळप या पुरात अडकल्याचा प्रकार समोर आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला याची माहिती मिळताच तात्काळ एक टीम घटनास्थळी रवाना करण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम कडून वानरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न केले.
अनेक झाडे पाण्याखाली गेल्याने वानरांचा कळप झाडावर अडकला आहे. गेल्या चोवीस तासांपासून दहा ते पंधरा वानरे झाडावर अडकून पडली आहेत. पोटात अन्न नसल्याने पिलांसह वानरांनी आरडाओरड सुरु केली होती भूकेल्या वानरांसाठी केळ आणि फळांची सोय करण्यात आली. वानरांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी टीमकडून दोर बांधण्यात आला. आणि अखेर वानरांची सुटका पुराच्या पाण्यातून करण्य़ात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, वनविभाग आणि प्राणीमित्रांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
Previous Articleसंजय राठोड आणि अब्दुल सत्तारांना मंत्रिपद दिल्याने शिवसैनिक आक्रमक; कोल्हापुरात निदर्शने
Next Article बिबट्या अद्याप रेसकोर्स परिसरातच









