विद्यार्थ्यांच्या झोपेची वेळ, स्क्रीम टाइम अन् आनंदाच्या पातळीबद्दल कळते माहिती
डेन्माईमधील शाळांमध्ये अॅप आधारित मूड मॉनिटरिंग तंत्रज्ञानाचा वापर आता वेगाने होऊ लागला आहे. आता काही शिक्षक आणि प्रशासक या अॅपमुळे मुलांचे मानसिक आरोग्य वेगाने सुधारण्यास मदत मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. मुलांच्या मानसिक आरोग्याला डेन्मार्कमध्ये महागाई, पर्यावरण संकट आणि राष्ट्रीय सुरक्षेइतकेच महत्त्व देण्यात आले आहे.
डेन्मार्कच्या शाळांमध्ये वूफ सारखे प्लॅटफॉर्म वेगाने वापरले जात आहेत. संबंधित कार्यक्रम पूर्ण डेन्माईमधील 600 शाळांमध्ये लागू आहे. वर्ग सुरू होण्यापूर्वी आता सर्व मुलांशी संवाद साधण्याची शिक्षकांना गरज भासणार नाही. कारण शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांचा मूड कसा आहे हे पूर्वीच माहित असणार आहे. मुलांनी योग्य झोप घेतली आहे की नाही? त्यांच्या शारीरिक हालचाली, इतरांसोबतचा संवाद, स्क्रीम टाइम किती होता याबद्दल पूर्ण माहिती शिक्षकांकडे असते असे वूफचे सह-संस्थापक मथियास प्रोबस्ट यांनी सांगितले आहे.

वूफ अॅपला शालेय विद्यार्थी संगणक किंवा मोबाइलवरून अॅक्सेस करतात. याच्या युजर इंटरफेसमध्ये एक कार्टून मुलांना त्यांच्या जीवनाबद्दल अनेक प्रश्न विचारते. अॅपला साप्ताहिक आधारावर वापर करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हा अॅप मुलांना त्यांचा मूड अन् जीवनाच्या अन्य पैलूंच्या आधारावर 1-5 च्या मानांकनात गुण प्रदान करते आणि पूर्ण वर्गासाठी मूड मीटर तयार करते.
हा अॅप वर्गावर लक्ष केंद्रीत करणे आणि अन्य मुद्द्यांवर सूचना देण्यासाठी अल्गोरिदमचा वापर करते. परंतु काही तज्ञ अशा मॉनटरिंगला खासगीत्वाचे उल्लंघन मानत आहेत. मुलांच्या डाटाचा गैरवापर होण्याची भीती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.









