वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
फ्रान्सच्या गेल मोनफिल्सने येथे झालेल्या नॉर्डिक ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावत कारकिर्दीतील 12 वे एटीपी जेतेपद पटकावले. मात्र गेल्या दोन वर्षात मिळविलेले त्याचे हे पहिलेच एटीपी जेतेपद आहे.
पात्रता फेरीतून आलेल्या पॅव्हेल कोटोव्हवर मोनफिल्सने चुरशीच्या ठरलेल्या अंतिम लढतीत 4-6, 7-6 (8-6), 6-3 अशी मात केली. या स्पर्धेत त्याने मिळविलेले हे दुसरे जेतेपद आहे. त्याने जानेवारी 2022 अॅडलेड येथील स्पर्धेत शेवटचे जेतेपद पटकावले होते.