वृत्तसंस्था/ माँट्रियल
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या कॅनेडीयन खुल्या पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत फ्रान्सचा गेल मोनफिल्सने तर महिलांच्या विभागात बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका आणि कॅरोलिना प्लिसकोव्हा यांनी विजयी सलामी देत पुढील फेरी गाठली.
या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात मोनफिल्सने अमेरिकेच्या क्रिस्टोपर युबँक्सचा 7-6 (7-3), 6-7(4-7), 6-1 असा पराभव करत विजयी सलामी दिली. मोनफिल्सचा दुसऱ्या फेरीतील सामना ग्रीकच्या सित्सिपसबरोबर होणार आहे. या स्पर्धेत सित्सिपसला पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे.

महिलांच्या विभागात बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने मॅगेडा लिनेटीचा 6-3, 6-0 असा फडशा पाडत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले तर दुसऱ्या सामन्यात कॅरोलिना प्लिसकोव्हाने चीनच्या झू लिनचा 6-3, 6-7(8-10), 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले.









