उचगाव/ वार्ताहर-
पाच लाखाच्या सावकारी कर्जापोटी ३२ लाखाची परतफेड करूनही ९० लाखाची मागणी करत कुटुंबास मारहाण केल्याची घटना गांधीनगर मध्ये घडली. याबाबत चंद्रकांत पुंडलिक सोनवणे आणि ऋषिकेश चंद्रकांत सोनवणे (रा. चांदणी चौक रविवार पेठ कोल्हापूर) या पिता पुत्रावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद शंकर नामोमल माखीजा रा. राधे राधे कॉलनी गांधीनगर ता. करवीर यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.
याबाबतची माहिती अशी शंकर माखीजा यांचे गांधीनगरातील लोहिया मार्केटमध्ये व्ही.एस. बरमूडा नावाचं दुकान आहे. शंकर यांचा मुलगा विकी याने व्यावसायिक गरजेसाठी चंद्रकांत सोनवणे यांचे कडून पाच लाख रुपये पंधरा टक्के व्याजाने घेतले होते. वेळोवेळी कर्जाच्या व्याजापोटी आरोपी सोनवणे यांनी माखीजा यांच्याकडून ३२ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कम वसूल केली. तरीही अजून ९० लाख रुपये रक्कम येणे बाकी असुन ही रक्कम कधी देणार असा तगादा लावला. या रकमेपोटी ५० लाखांचा गांधीनगर मधील भूखंड आपल्या नावे करण्याची मागणी सोनवणे यांनी विकी माखीजा यांच्याकडे केली. हा भूखंड नावावर का करत नाही अशी विचारणा करून सोनवणे पिता पुत्रानी शंकर माखीजा यांच्या घरात घुसून त्यांचा मुलगा सुरज याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
सोनवणे पिता पुत्रानी सावकारी कर्जाच्या परतफेडीसाठी आपल्या कुटुंबाचा शारीरिक मानसिक छळ करून आर्थिक पिळवणूक केल्याची फिर्याद माखीजा यांनी गांधीनगर पोलिसात दिली आहे. त्यावरून सोनवणे पिता पत्रावर सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा अधिक तपास सपोनी सत्यराज घुले करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









