Kolhapur Crime : सावकारी कर्जातून खून, मारामारी सारख्या अनेक घटना आपण पाहिल्या ऐकल्या असतील, मात्र कोल्हापूर जिल्ह्यात महिलेला कर्जाच्या बदल्यात वेश्या व्यवसाय करायला भाग पाडू, अशी धमकी सावकाराने दिल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.सावकार कोल्हापूर शहरातील जवाहर नगर परिसरातील असून ही महिला कोल्हापूर शहराला लागून असलेल्या एका गावामधील आहे.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार,
घर बांधण्यासाठी घेतलेल्या 25 लाख रुपयांच्या बदल्यात सावकाराने 85 लाख रुपयांची मागणी केली आहे. पैसे द्या, अन्यथा वेश्या व्यवसाय करायला भाग पडू, अशी धमकी दिली आहे. अनेक दिवसांपासून सावकाराच्या गुंडांकडून त्रास दिला जात आहे. कारसुद्धा या गुंडांनी ताब्यात घेतली असून घरही नावावर करून घेतलं आहे. घरातून बाहेर पडा, अन्यथा महागात पडेल अशा धमक्या दिल्या जात आहेत. दररोज येऊन प्रापंचिक साहित्य घराबाहेर टाकण्यात टाकले जात असल्याचे पीडित महिलेनं म्हटलं आहे.अशा प्रकारचा मानसिक त्रास दिला जात असल्याचेही तिचे म्हणणे आहे. पोलिसांकडे दाद मागूनही कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नसल्याची भावना या संबंधित महिलेने व्यक्त केली आहे. त्यामुळे या महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गावगुंडांमुळे त्रस्त झालेल्या महिलेने आता न्यायाची मागणी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









