ऑनलाईन टीम/तरुण भारत
मनी लॉन्ड्रिंग (MONEY LAUNDERING) प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मालिक (Nawab_Malik) यांना ईडीने (ED) मोठा दणका दिला आहे. नवाब मालिकांच्या ८ मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. यामध्ये उस्मानाबादेत १४८ एकर जमीन तसेच मुंबईच्या कुर्ल्यातील तीन प्लॉट्स, वांद्रेतील दोन प्लॉट्स आणि गोवावाला कंपाउंडमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पावणे दोन महिन्यांपासून नवाब मलिक ईडीच्या ताब्यात असून त्यांची संपत्ती आता जप्त करण्यात आली आहे.
मलिकांची जप्त केलेली संपत्ती –
गोवावाला कंपाऊंड, कुर्ला (पश्चिम)
एक व्यावसायिक युनिट, कुर्ला (पश्चिम).
उस्मानाबाद जिल्ह्यातील१४८एकर शेतजमीन
कुर्ला पश्चिम इथले तीन फ्लॅट
वांद्रे पश्चिम इथले दोन फ्लॅट