गोरेगाव इथल्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने काल अटक केली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. तर काही नेत्यांनाही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान बंडखोर नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ८ वाजताचा तो भोंगा आता बंद झाला अशा शब्दात टीका केली.(Money Laundering Case Sanjay Raut Arrest after CM Eknath Shinde Comment )
यावेळी बोलताना ते म्हणाले, ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला, ते आपापल्या कर्माने जातील’. येथून पुढे तो सकाळी आठ वाजताचा भोंगा वाजायचा बंद होणार आहे, अशा शब्दात निशाणा साधला. दरम्यान काल संजय राऊत यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी मोठा गराडा घातला होता. आज राऊत यांना ईडी कोर्टासमोर हजर करणार आहे. त्यामुळे ईडी राऊतांच्या कोठडीची मागणी करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. थोड्याच वेळात त्यांना जे.जे रुग्णालयात मेडिकलसाठी नेणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








