शरमन जोशी मुख्य भूमिकेत
बॉलिवूड अभिनेता शरमन जोशी स्वत:च्या अभिनयावरून चर्चेत असतो. शरमन सध्या स्वत:च्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. शरमनच्या ‘कफस’ या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘कफस’ वेबसीरिजमध्ये शरमनसोबत मोना सिंह देखील मुख्य भूमिकेत आहे. शरमने सोशल मीडियावर एक मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट करत सर्वांना धक्का दिला आहे. हा टीझर सादर झाल्यावर चाहते आता या सीरिजची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
मोना सिंहने देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री अत्यंत घाबरलेल्या स्थितीत दिसून येते. मला गप्प बसण्याचे पैसे देण्यात आले आहेत, मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही असे तिने कॅप्शनदाखल नमूद पेल आहे. टीझरच्या प्रारंभी मोना अत्यंत घाबरलेली दिसून येते, ती किचनमध्ये काम करतस् असताना तिच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्टपणे दिसून येते, यानंतर ती ‘अब नहीं होगा, अब नहीं होगा सॉरी’ असे म्हणत असल्याचे दिसून येते, यानंतर मोना स्वत:च्या तोंडावर टेप चिकटवत असल्याचे टीझरमध्ये दाखविण्यात आले आहे.









