स्पेशल 26 यासारख्या सुपरहिट चित्रपटाचा दिग्दर्शक नीरज पांडे आता नवी वेबसीरिज ‘द फ्रीलान्सर’ घेऊन येत आहे, याचा टीझर जारी करण्यात आला आहे. ही वेबसीरिज एक सप्टेंबरपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित केली जाणार आहे. द फ्रीलान्सर या सीरिजमध्ये अनुपम खेर, सुशांत सिंह, मोहित रैना आणि कश्मीरा परदेसी यासारखे कलाकार दिसून येतील. या सीरिजमध्ये मोहित रैना मुख्य भूमिकेत आहेत. तर अनुपम खेर यांनी यात विश्लेषकाची भूमिका साकारली आहे. ही वेबसीरिज शिरीष थोरात यांची कादंबरी ‘ए तिकीट टू सीरिया’वर बेतलेली आहे. या वेबसीरिजची कहाणी एका बचावमोहिमेवर आधारित असून यात इस्लामिक स्टेटच्या कब्जातील सीरियात मालदीवच्या एका युवतीला बळजबरीने डांबून ठेवले जात असल्याचे दाखविण्यात येणार आहे. ही युवती तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न कशाप्रकारे करते हे या सीरिजमध्ये पाहता येईल. सीरिजमध्ये या युवतीची भूमिका कश्मीराने साकारली आहे. या सीरिजचे चित्रिकरण विदेशात अनेक ठिकाणी पार पडले आहे. मोहित रैना यापूर्वी काफिर, भौकाल, ए व्हायरल वेडिंग आणि मुंबई डायरीज 26/11 यामुळे ओटीटी स्टार ठरला आहे. बॉलिवूड चित्रपट उरी: द सर्जिकल मधील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.
Previous Articleनूह हिंसाचारातील आणखी दोघांना अटक
Next Article ईपीएफओच्या व्याज हस्तांतरण प्रक्रियेस प्रांरभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









