विनया कोटियन स्मृती चषक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा
बेळगाव : बेळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटना आयोजित विनया कोटियन स्मृती चषक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 13 वर्षां खालील गटात मुलांच्या गटात मोहित बेलावाडी तर मुलींच्या गटात साक्ष्या संतोष यांनी विजेतेपद पटकाविले. टिळकवाडी क्लब येथे सुरू आसलेल्या या टेटे स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात दिपक विनयने पूरब बिस्वासचा 9-11, 11-2, 11-8, 11-4 असा पराभव केला. हर्षितने रयांश गर्गचा 11-9, 11-7, 14-16, 12-10 असा पराभव केला. मोहित बेलावाडीने यश विश्वासचा 11-4, 8-11, 12-10, 11-6 असा पराभव केला. सुचेत धरणेन्नवरने अंकुश बालिगाला 11-7, 11-8, 15-13 ने पराभूत करत उपात्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत दिपक विनयने सेमी हर्षितचा 14-12, 18-16, 11-9 असा पराभव केला. मोहित बेलवाडीने
सुचेत धरणेन्नवरचा 12-10, 7-11, 12-10, 11-9 असा पराभव केला. अंतिम मोहित बेलवाडीने दिपक विनयचा 11-6, 14-12, 7-11, 13-11 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. 13 वर्षांखालील मुलींची एकेरीत युक्ता हर्षने विभा तवकारीचा 11-9, 11-7, 11-5 असा पराभव केला. लक्ष्मी आश्रिताने कृष्णा पी करकेराला 8-11, 3-11, 11 -6, 11-7, 11-6 ने पराभूत केले. मिहिका आर उडुपी हिने अनया अग्रवालचा 11-8, 11-6, 11-3 असा पराभव केला. साक्ष्या संतोषने तमन्ना नेरलाजेचा 11 -3, 9-11, 11-3, 11-3 असा पराभव केला. उपांत्य फेरीत साक्ष्या संतोषने मिहिका आर उडुपीचा 11-7, 14-12, 11-9 असा पराभव केला.आश्रिताने युक्ता हर्षाचा 5-11, 11-7, 4-11, 11-6, 11-9 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात साक्ष्या संतोषने लक्ष्मी आश्रिताचा 11-6, 12-14, 11-8, 8-11, 11-7 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.









