रोमँटिक चित्रपटात दिग्गज स्टार मुख्य भूमिकेत
हृदयपूर्वम या चित्रपटाचा ट्रेलर सादर करण्यात आला असून यात मोहनलाल यांना प्रेमाच्या रंगात रंगलेले पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी नवा अनुभव असणार आहे. आतापर्यंत अॅक्शनपटांसाठी अधिक चर्चेत राहिलेले मोहनलाल या चित्रपटात एच गॅपयुक्त प्रेमकथेचा हिस्सा झाले आहेत. हृदयपूर्वम चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मोहनलाल यांची व्यक्तिरेखा स्वत:च्या एका जेन जी मित्राला स्वत:च्या भावनांबद्दल सांगताना दिसून येते, यात ही व्यक्तिरेखा गोंधळात पडलेली असल्याचे दाखविण्यात आले आहे. चित्रपटात मोहनलाल आणि मालविका मोहनन यांच्या व्यक्तिरेखांदरम्यान एक अनोखे नाते बहरते, तर प्रत्यक्षात दोघांच्याही वयात मोठे अंतर आहे.
सत्यन एंथिकाड यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात मोहनलाल, मालविका मोहनन यांच्यासोबत संगीत प्रताप, सिद्दीकी, निशान, बाबूराज, लालू एलेक्स, जर्नादन हे कलाकारही दिसून येणार आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.









