के. आर. शेट्टी चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के. आर. शेट्टी निमंत्रितांच्या ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून नील बॉईज, मोहन मोरे, जेएसपी बेळगाव संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन पुढील फेरीत प्रवेश केला. शाहू, अभिषेक, केदारनाथ उसुलकर, आकाश यांना ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या के. आर. शेट्टी क्रिकेट स्पर्धेच्या बुधवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात पी. जी. फायटर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 9 गडी बाद 69 धावा केल्या. त्यात प्रकाशने 31 तर प्रमोदने 13 धावा केल्या. जीएसपी बेळगावतर्फे राहुलने 13 धावांत 3 तर शाहूने 4 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना जीएसपी बेळगाव संघाने 7 षटकात 2 गडी बाद 70 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात शाहूने 3 षटकार, 3 चौकारांसह 40 तर राहुल कदमने 15 धावा केल्या. पी. जी. फायटर्सतर्फे रघु व आकाशने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात शायनिंग स्टारने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 51 धावा केल्या. त्यात इम्रानने 2 षटकार 2 चौकारांसह 26 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे फजलने 9 धावांत 2 तर रवी व आझादने प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे संघाने 3.3 षटकात 1 गडी बाद 54 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात अभिषेकने 2 षटकार 2 चौकारांसह 26, मेहुलने 3 चौकारांसह 15 तर नितीने 12 धावा केल्या. शायनिंग स्टारतर्फे विनायकने 1 गडी बाद केला. तिसऱ्या सामन्यात एकता स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 74 धावा केल्या. त्यात मारुती के.ने 4 षटकार 1 चौकारांसह 37, विठ्ठलने 10 धावा केल्या. नील बॉईज हिंडलगातर्फे सुशांत कोवाडकर, विशाल व तनिष्क नाईकने प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नील बॉईज हिंडलगाने 5.2 षटकात 1 गडी बाद करुन 76 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात केदारनाथ उसुलकरने 4 षटकार 3 चौकारांसह 40, सुशांत कडोलकरने 23 तर तनिष्क नाईकने 11 धावा केल्या. एकतातर्फे मारुती व सचिन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
चौथ्या सामन्यात जेएसपी स्पोर्ट्स कपिलेश्वर कॉलनी संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 7 गडी बाद 84 धावा केल्या. त्यात शाहु विनायकने 3 षटकार, 1 चौकारासह 27, विनायक चव्हाणने 20 तर राहुल कदमने 13 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे आकाशने 6 धावांत 3, आझादने 2 तर मेहुलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे संघाने 5.2 षटकात 4 गडी बाद 88 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात मेहुलने 2 षटकार, 5 चौकारांसह 38, नितीनने 3 षटकारासह 21 तर अभिषेकने 1 षटकार 3 चौकारांसह 18 धावा केल्या. जीएसपीतर्फे राहुल लोहारने 17 धावांत 3 तर रोहीतने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार, इम्पॅक्ट खेळाडू, उत्कृष्ट झेल, सर्वात अधिक षटकार खेचणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चषक देवून गौरविण्यात आले.
गुरुवारचे सामने
- ए. एम. बॉईज विरुद्ध बेळगावची नारायणी यांच्यात सकाळी 9 वाजता
- प्रथमेश मोरे विरुद्ध दफा 302 यांच्यात सकाळी 11 वाजता
- तिसरा सामना पहिला सामन्यातील विजेता विरुद्ध नील बॉईज हिंडलगा यांच्यात 1 वाजता
- चौथा सामना दुसऱ्या सामन्यातील विजेता विरुद्ध मंगाई स्पोर्ट्स यांच्यात दुपारी 3 वाजता
प्रथमेश मोरे संघात भारताचे दिग्गज टेनिसबॉलपटू प्रथमेश पवार, मुन्ना शेख, फरदिन काझी हे खेळणार असून त्यात गुजरातच्या खेळाडूंचाही समावेश आहे.









