वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आयसीसीतर्फे प्रत्येक महिनाअखेर पुरूष आणि महिलांच्या विभागात कामगिरीचा आढावा घेत सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड केली जाते. आयसीसीतर्फे मासिक सर्वोत्तम महिला आणि पुरूष क्रिकेटपटू घोषित केले जातात. आता नोव्हेंबर महिन्यासाठी पुरूष विभागात भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी करण्यात आलेली आहे. नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटूच्या शर्यतीमध्ये आता मोहम्मद शमी, ऑस्ट्रेलियाचे ट्रेव्हिस हेड आणि मॅक्सवेल यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 33 वर्षीय शमीने 24 गडी बाद केले होते. या कामगिरीची दखल घेऊन त्याची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. या स्पर्धेतील अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेलने दर्जेदार कामगिरी करत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. मॅक्सवेलने आपल्या शिस्तबद्ध गोलंदाजीवर रोहित शर्माला लवकर बाद केले होते. तसेच त्याने फलंदाजी करताना विजयी धावा घेतल्या होत्या. तसेच या स्पर्धेनंतर भारतात झालेल्या टी-20 मालिकेत मॅक्सवेलने गौहत्तीच्या सामन्यात 48 चेंडूत नाबाद 104 धावांची वादळी खेळी केली होती.









