‘आयसीसी’ची एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारी जाहीर
श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांत सातत्यपूर्ण कामगिरी केलेला भारताचा सध्याचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या ‘आयसीसी’च्या एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. सिराजने श्रीलंकेविऊद्धच्या तीन सामन्यांत 9 बळी घेतले होते, तर न्यूझीलंडविऊद्धच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात चार बळी टिपले. सिराजचे एकदिवसीय सामन्यांतील गोलंदाजांच्या क्रमवारीत 729 रेटिंग गुण झाले आहेत आणि तो ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडपेक्षा दोन गुणांनी आघाडीवर आहे.
‘आयसीसी’च्या एकदिवसीय सामन्यांतील गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा सिराज हा सहकारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनंतरचा पहिला भारतीय गोलंदाज आहे. बुमराह गेल्या वषी जुलैमध्ये इंग्लंडविऊद्ध शानदार कामगिरी केल्यानंतर पहिल्या स्थानावर पोहोचला होता.
28 वषीय सिराजने गेल्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारांत झळाळती कामगिरी केली. त्याने तीन वर्षांनी फेब्रुवारीमध्ये एकदिवसीय संघात पुनरागमन केले आणि तेव्हापासून 21 सामन्यांत 37 बळी घेतलेले आहेत. शिवाय, सिराजने त्याच्या मागील 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येकी एक किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. या आठवड्याच्या सुऊवातीला त्याला ‘आयसीसी’च्या एकदिवसीय संघातही स्थान देण्यात आले. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय सामन्यांसाठीच्या गोलंदाजांच्या नवीन यादीत एकूण 11 स्थानांनी झेप घेत 32 वे स्थान मिळविले आहे. तर
शुबमन गिलने विराटला मागे टाकले
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धची भारताची मायदेशातील मालिका संपल्यानंतर फलंदाजांच्या क्रमवारीत बरेच बदल झाले आहेत. फलंदाजांमध्ये शुबमन गिलला न्यूझीलंडविऊद्धच्या विक्रमी खेळीसह त्याने केवळ तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये केलेल्या 360 धावांनी सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. याभरात गिलने क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या विराट कोहलीला मागे टाकले आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावल्यानंतर रोहित शर्माचेही स्थान उंचावले असून तो आता क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधील आघाडीचे गोलंदाज
मोहम्मद सिराज (भारत) – 729 गुण
जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया) – 727 गुण
ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) – 708 गुण
मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – 665 गुण
रशिद खान (अफगाणिस्तान) – 659 गुण









