वृत्तसंस्था/ पोझनेन (पोलंड)
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 800 मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक मिळविणारा भारताचा धावपटू पी. मोहम्मद अफसलने पोलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत यापूर्वी स्वत:च नोंदविलेला राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. मोहम्मद अफसलने या क्रीडा प्रकारात 1.44.96 मिनिटाचा अवधी घेतला. मात्र पोलंडमधील या स्पर्धेत त्याला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारात पोलंडच्या विडेरकाने सुवर्ण, ओस्ट्रो वेस्कीने रौप्य तर सिरेझेकीने कांस्यपदक घेतले.









