वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लीश प्रिमीयर लीग फुटबॉल स्पर्धेत लिव्हरपूल फुटबॉल क्लबचा आघाडी फळीतील जागतिक फुटबॉलपटू मोहम्मद सलाह सौदी अरेबियाच्या अल-इतिहाद क्लबमध्ये दाखल होणार आहे. लिव्हरपूल आणि सौदीच्या या फुटबॉल क्लबमध्ये अद्याप अधिकृत करार झाला नसला तरी लिव्हरपूलने सलाहच्या बदलीसाठी मान्यता दिली आहे.
मोहम्मद सलाह याला लिव्हरपूलकडून प्रत्येक आठवड्याला 350,000 पौंडस्ची रक्कम वेतन म्हणून मिळते. आता सौदीच्या अल इताद क्लबकडून सलाहला यापेक्षा अधिक मानधन मिळणार आहे. सौदीमधील अल नासेर क्लबने पोर्तुगालच्या ख्रिस्टीयानो रोनाल्डोला यापूर्वीच कराराबद्ध केले असून त्याला या क्लबकडून प्रत्येक वर्षी 175 दशलक्ष पौंडस्ची रक्कम वेतन म्हणून दिले जात आहे. आता अल इताद फुटबॉल क्लब सलाहला रोनाल्डोपेक्षा जास्त मानधन देण्याचे ठरविले आहे.









