वृत्तसंस्था/ लंडन
2021 च्या फुटबॉल हंगामातील लिव्हरपूल फुटबॉल क्लबकडून आघाडी फळीत खेळणारा मोहम्मद सलाह याची इंग्लंडमध्ये सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड केली आहे. इजिप्तच्या मोहम्मद सालाहने हा बहुमान दुसऱयांदा पटकाविला आहे.
इंग्लंड फुटबॉल क्षेत्रामध्ये प्रत्येक वषी प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील विविध फुटबॉलपटूंच्या कामगिरीचा आढावा घेत सर्वोत्तम फुटबॉलपटूची निवड फुटबॉल रायटर्स संघटनेतर्फे (एफडब्ल्यूए) केली जाते. इजिप्तच्या मोहम्मद सालाहने 2018 साली पहिल्यांदा हा बहुमान मिळविला होता. 2021 च्या सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या शर्यतीमध्ये मोहम्मद सालाह तसेच मँचेस्टर सिटीचा केव्हिन डी बुइन आणि वेस्टहॅम युनायटेडचा राईस यांच्यात चुरस होती. 29 वषीय सालाहने आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. त्याने 2021 च्या फुटबॉल हंगामात 44 सामन्यात 30 गोल नोंदविले आहेत. त्याचप्रमाणे महिलांच्या विभागात ऑस्ट्रेलियाची आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉलपटू सॅम केरची सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली. 5 मे रोजी आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण समारंभात सलाह आणि केर यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.









